27.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeDapoliआम. योगेश कदमांचे अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप

आम. योगेश कदमांचे अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप

अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा कट करत असल्याचा थेट आरोप योगेश कदम यांनी केला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यामधील वाद सर्वज्ञात आहेत. अनेक गंभीर आरोप प्रत्यारोप त्यांनी एकमेकांवर केले होते. अनिल परब हे छुप्या पद्धतीने शिवसेना संपवायला निघालेत,असं रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर आता अलीकडेच राज्यात एकनाथ शिंदे यांचा बंड झालं आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला एक मोठा गट शिंदेंसोबत गेला आणि राज्यात नवं सरकार उदयाला आलं.

शिंदेंसोबत गेलेल्या या गटात आमदार योगेश कदम यांचा देखील समावेश होता. आता योगेश कदम यांनीही पुन्हा अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा कट करत असल्याचा थेट आरोप योगेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत.

खेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कदम यांनी बंडामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. यावेळी ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांच्या काळात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून माझे सारखे खच्चीकरण करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करण्यात आला. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला डावलून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांकडे आणि नेहमीच शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्‍या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यामुळे गेली सहा महिने माझ्यावर अन्याय झाला आहे.

आणि मी गुवाहटीला पळून गेलेलो नाही. मी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना मी तिथे जातोय याची कल्पना दिली होती. पालकमंत्री अनिल परब यांच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मी एकनाथ शिंदे गटात सामील होताना वडील शिवसेना नेते रामदास कदम यांना देखील कल्पना दिली होती. तिथे गेल्यानंतर देखील मी वडील या नात्याने रामदास कदम यांच्या सतत संपर्कात होतो. असे योगेश कदम म्हणाले आहेत. रामदास कदम या साऱ्या राजकीय घडामोडीत मला सल्ले देत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर, माझ्यासह अनेक सेनेचे आमदारांची पुढचे चार-पाच दिवस झोप उडाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular