24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriमोबाईल चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन

मोबाईल चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन

एकाच मार्गावरील रेल्वेची दोन किंवा चार तिकिटं काढून त्या तिकिटाच्या आरक्षणाप्रमाणे सदर डब्यामध्ये जाऊन तो मोबाईल चोरायचा.

रेल्वेमध्ये सऱ्हाईतपणे मोबाईल चोरणारा चोरटा हातातील बेड्यांसह पळाल्याची घटना रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या चोरट्याच्या मागावरच होते. नैसर्गिक विधीचं कारण सांगत चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते.

रेल्वेत मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराने हातातील बेड्यांसह पलायन केल्याची घटना रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात घडली आहे. मुख्य बाब म्हणजे, रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या या चोराच्या मागावर पोलीस मागील अनेक दिवसांपासून होते. त्याला पकडण्यात यश देखील आल आहे. त्यानंतर या चोरावर गुन्हा दाखल करण्यासाठी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं.

गुन्हा दाखल करण्यात बराच वेळ गेल्यानं या चोरानं नैसर्गिक विधीला जातो, असं सांगितलं. त्यानंतर त्यानं थेट पोलिसांच्या हातावर तुरी देतस तेथून पोबारा केला. शनिवारी दुपारी चारनंतर ही घटना घडली, परंतु, रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमधून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही माहिती पोलीस प्रसारमाध्यमांना देत नाहीत.

पण मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गोडसे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. मागील अनेक दिवसांपासून मागावर असलेल्या दत्तात्रय गोडसेची कृती म्हणजे, हा ‘रेल्वेमध्ये चार्जिंगला लावलेले आणि खिशातील मोबाईल चोरण्यात माहीर आहे. एकाच मार्गावरील रेल्वेची दोन किंवा चार तिकिटं काढून त्या तिकिटाच्या आरक्षणाप्रमाणे सदर डब्यामध्ये जाऊन तो मोबाईल चोरायचा. त्यानंतर चोरलेले मोबाईल मुंबईत जाऊन विकायचा आणि पैशावर मौजमजा करायचा. अखेर शनिवारी पहाटे मोबाईल चोरी करताना त्याला रेल्वे पोलिसांनी पकडलं.

RELATED ARTICLES

Most Popular