23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeIndiaअखेर शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय

अखेर शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून नव्याने पारित केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी समस्त भारतवासीयांची हाथ जोडून माफी मागत शेतकऱ्यांना आपापल्या घरी परतण्यास सांगितले आहे. अखेर शेतकऱ्यांच्या कित्येक महिन्याच्या एकजुटीच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच आंदोलन गेले कित्येक महिने चालू आहे. या आंदोलनात अनेक घडामोडी घडल्या. त्याचे पडसाद जगभर उमटले.

या आंदोलनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकर्यांना संबोधित करत कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. दरम्यान, पंतप्रधानांच्या या घोषणेवर देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया देत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे म्हटले.

मोदी सरकारच्या काळात, नव्याने केलेले तीनही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया जनतेसमोर मांडली असून, आंदोलन आताच मागे घेणार नसल्याचं देखील म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत,  ज्या दिवशी संसदेमध्ये अधिकृत रित्या कृषी कायदे रद्द केले जातील. तसेच सरकार एमएसपी सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यास तयार असेल,  असं राकेश टिकैत म्हणाले.

काही शेतकरी संघटनांनी हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही महिने आंदोलन केले होते. आज गुरु नानक जयंती आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही हे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करत आहे,  असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले कि, प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही,  असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular