राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर सोमवारी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. मारुती मंदिर ते जिल्हा परिषद अशा जोरदार घोषणा बाजीत काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होते. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. शासनाने त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, मानधनात १०० टक्के वाढ, सेवेत कायम स्वरूपी समायोजन आणि ५८ वर्षांनंतर सेवानिवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या म ागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांचे निवेदन शासन दरबारी सादर केले.
या आहेत मागण्या – १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन नियमित वेतन श्रेणीत समाविष्ट करावे आणि दरवर्षी ३ टक्के मानधनवाढ द्यावी. ६० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्यांना सेवानिवृत्तीनंतर लाभ द्यावा. तसेच, परफॉरमन्स रिपोर्टनुसार वेतनवाढ आणि कठोर कारवाईऐवजी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची मागणी करण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांसाठी ६. महिन्यांची रजा, ४ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्यांना विशेष मानधन वाढ, आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांची मदत (अपघाती मृत्यू झाल्यास ४० लाख) देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विराट मोर्चा – गेल्या आठवडाभरापासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मारुती मंदिर ते जिल्हा परिषद असा सोमवारी मोर्चा काढला. अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत असूनही त्यांना पुरेसे मानधन मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शासनाने त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या काळात आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.