महाराष्ट्र मध्ये चंद्रपुर जिल्ह्यात अंगावर शहारे येणारी घटना घडली आहे. आपल्या ५ वर्षाच्या मुलीला वाचण्यासाठी आई बिबट्याशी लढली. बिबट्याचा तोंडात मुलीला बघून जीव वाचवण्यासाठी त्या बहादूर आईने दांड्याने सामना केला. आईच्या ममतेपूढे त्या बिबट्याला सुद्धा नमावे लागले आणि मुलीला तिथेच सोडून बिबट्या पळून गेला.
चंद्रपुर शहराच्या नजिक जूनोना गावात आई अर्चना मेश्राम आपल्या ५ वर्षिय मुलगी प्राजक्ता सोबत गावाच्या बाजूच्या ओढ्याकाठी जंगली भाज्या काढण्यास गेली होती. भाजी काढताना मुलगी प्राजक्ता आपल्या आई पासुन थोडी लांब होती, तेव्हा आधीपासून दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक मुलीवर हल्ला केला. बिबट्याने मूलीचे डोक जबड्यात घेतलं. हे बघून आईच भान हरपले. तिने स्वतःला सावरत बिबट्यावर हल्ला केला. तिने बाजूला असलेल्या दांड्याने बिबट्यावर मारण्यास सुरवात केली. या दरम्यान बिबट्याने मुलीला सोडले आणि आईवर हल्ला केला.
बिबट्याचा हल्यापासून कस तरी स्वतःला वाचवलं, पण बिबट्याने आईला सोडून पुन्हा मुलीला आपल्या जबड्यात घेतलं आणि ओढत घेऊन जाऊ लागला. हे पाहून आई बिबट्याचा मागे धावत जाऊन त्याच्यावर वारंवार दांड्याने वार करत राहिली. महिलेच्या बहादूरी पूढे बिबट्याला सुद्धा नमावे लागले आणि त्या मुलीला तिथे सोडून बिबट्या जंगलात पळून गेला. बिबट्याचा हल्ल्यात मुलगी भरपूर जखमी झाली. तिच्या चेहर्यावर व डोक्यावर खोल जखमा झाल्या. महीलेने आपल्या जखमी मुलीला लगेच जवळच्या दवाखान्यात नेले. प्राथमिक उपचारानंतर मुलीला नागपूरला सरकारी दवाखान्यात तिच्यावर उपचार चालू आहेत.
जखमी मुलीच्या वडीलांनी सांगितले की, पत्नी अर्चना ने मोठ्या हिम्मतीने मुलीला वाचविले. मुलीचे उपचार चालू आहेत. डॉक्टरांनी सांगितले मुलीचा जीव धोक्यातून बाहेर आला आहे. संदिप मेश्राम यांनी सांगितले की बिबट्या रोज बकर्याचा शिकारी साठी येत असतो. यावेळी सुद्धा बिबट्या बकरीच्या शिकारीसाठी आला असेल पण त्याला छोटी मुलगी दिसली म्हणून त्याने तिच्यावर हल्ला केला.