शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक नाराज नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात लवकरच येणार आहेत. त्यांना खासदार विनायक राऊत यांनी सांभाळावे, असे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथे सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत काल (ता.१७) चिपळूणच्या दौऱ्यावर होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले शिवसेनेचे अनेक आमदार पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे येण्यास इच्छुक आहेत. ठाकरेंची गटात माफी मागून ते पक्षात येण्यास तयार आहेत. लवकरच हा राजकीय भूकंप होईल, असे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर आज चिपळूणच्या दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याशी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात अनेकांना बढती मिळाली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत; पण एकनाथ शिदि गटात येणान्यांची संख्य दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ज्या महिला नेत्यांनी आक्रमकपणे उद्भव ठाकरेंची बाजू मांडली त्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. ठाकरे गटातील अनेक नेते नाराज आहेत. यातील काहीजण शिदि गटात येण्यास तयार आहेत. खासदार राऊत यांनी ही गळती थांबण्यासाठी प्रयत्न करावेत असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.