25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraमहावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास सहा मासिक हप्त्यांची सोय

महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास सहा मासिक हप्त्यांची सोय

ग्राहकांचा सरासरी वीज वापर कमी झालेला दिसल्यास, सुरक्षा ठेवी मधील जादा रक्कम देखील त्यांच्या वीजबिलामध्ये समायोजित करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात अनेक वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून बिलामार्फत कळविण्यात आले आहे. आणि त्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या बाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांचा सरासरी वीज वापर कमी झालेला दिसल्यास, सुरक्षा ठेवी मधील जादा रक्कम देखील त्यांच्या वीजबिलामध्ये समायोजित करून देण्यात येणार आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.११ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.

याआधी जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देखील पाठवण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमे इतकी असायची. आता वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून उपलब्ध करण्यात आली आहे.

या नवीन तरतुदीनुसार एप्रिल महिन्यामध्ये वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्यामुळे महावितरणकडून सुरक्षा ठेवीची बिल भरून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular