25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriएका महिन्याची थकबाकी असली तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश

एका महिन्याची थकबाकी असली तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश

परंतु, बिल माफ होण्याच्या शक्यतेने अनेक ग्राहकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने महावितरणची थकबाकी प्रचंड वाढली.

कोरोना महामारीच्या काळात महावितरण कंपनीपुढे थकीत बिलाचे मोठे आवाहन उभे राहिले. या काळात शासनाने सर्व थरातील नागरिकांना सवलती दिल्या होत्या. त्यामध्ये महावितरण कंपनीचे वीजबिल भरण्याबाबतही सवलत देण्यात आली होती. परंतु, बिल माफ होण्याच्या शक्यतेने अनेक ग्राहकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने महावितरणची थकबाकी प्रचंड वाढली.

महावितरणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांची थकबाकी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. जिल्ह्यातील ९६ हजार ६०९ ग्राहकांनी महावितरणचे १५ कोटी २८ लाख रुपये थकवले आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक सर्वांत जास्त ८४ हजार ७८८ एवढे आहेत. वाणिज्य १० हजार ३२८ आणि औद्योगिक १ हजार ४९३ ग्राहकांचा समावेश आहे. एका महिन्याची थकबाकी असली तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश कोकण परिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार महावितरणने जिल्ह्यातील १६८ थकीत ग्राहकांना दणका देऊन त्यांच्या वीज जोडण्या तोडल्या. मात्र, काही ग्राहक लगेच थकबाकी भरत असल्याने हा आकडा कमी, जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवता येत आहे.

थकबाकीच्या संकटाने कंपनीची आर्थिक घडीच पूर्णपणे विस्कटून गेली. महावितरण कंपनीवर मोठे आर्थिक संकट आल्यानंतर कंपनीने नियम कडक करून थकबाकी वसुली सुरू केली. तीन महिन्याचे एकदम बिल काढल्याने ग्राहकांमध्ये संताप झाला. काही राजकीय पक्षांनी याविरुद्ध आंदोलनं केली;  मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर कोरोनातील निर्बंध शिथिल करून परिस्थिती पूर्वपदावर आली तरी महावितरण कंपनीची थकबाकी मात्र कमी होण्याचे नाव घेईना.

जिल्ह्यातील थकबाकी तेव्हा ८४ कोटींच्या वर होती; मात्र थकबाकी वसुलीसाठी कंपनीने कठोर पावले उचलल्याने हळूहळू थकबाकी कमी होत आली. महावितरण कंपनीने वीजबिल जरी एक महिना थकले तरी जोडणी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular