27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...
HomeMaharashtra“या” ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार

“या” ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार

महाराष्ट्र राज्य हे प्रगतशील राज्य असून हे पार्क झाल्यानंतर राज्याची प्रगती अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुरदृश्य प्रणालीद्वारे याबाबत बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये आणि विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार असून मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून वाहतूक खर्चामध्ये बचत होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

श्री. गडकरी म्हणाले, सध्याच्या काळामध्ये वाहतुक खर्च दिवसेंदिवस वाढत असून भारतामध्ये हा खर्च १६% पर्यंत आहे. या खर्चामध्ये मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या माध्यमातून सुमारे ६ ते ७% बचत करता येणे शक्य आहे.

श्री. सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, राष्ट्रीय महामार्ग लॉजीस्टिक मेनेजमेंट आणि रेल्वे विकास निगम लि. या विभागाच्या सामंजस्य करारानुसार हे पार्क तयार होणार आहेत. या पार्क साठी आवश्यक असणारी जागा राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.

महाराष्ट्र राज्य हे प्रगतशील राज्य असून हे पार्क झाल्यानंतर राज्याची प्रगती अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. श्री. सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरी, जालना,  जळगाव, सोलापूर, नाशिक, भिवंडी, अकोला, सांगली या ठिकाणी हे मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार असून या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार आहे. वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे पर्यायाने वस्तूंच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा उद्योजकांना आणि ग्राहकांना होणार आहे.

राज्यामध्ये या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क झाल्यामुळे रत्नागिरी येथून आंबा, काजू, नाशिक, सांगली, जळगाव इत्यादी भागातून द्राक्ष, नागपूर येथून संत्री, अकोला येथून डाळ तसेच पश्चिम महाराष्ट्रातून साखर यांची निर्यात करणे अधिक सोयीचे होणार असून, वाहतूक खर्चात बचतही होणार आहे. तसेच या माध्यमातून निर्यात व्यवसायास गती मिळणार असून या भागाच्या विकासामध्ये भर पडणार असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular