30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

माजी मंत्री बच्चू कडूंचा निवडणूक आयोगासह ईव्हीएमवर हल्लाबोल

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू...

जि. प. आरक्षणाची लॉटरी फुटली! बहुतेक पुढाऱ्यांचे मनोरथ पूर्ण होणार

रत्नागिरी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोमवारी जाहीर...

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...
HomeRatnagiriमुंबई-गोवा महामार्गाचे रडगाणे सुरूच ना. शिवेंद्रराजे आज दिलासा देणार का?

मुंबई-गोवा महामार्गाचे रडगाणे सुरूच ना. शिवेंद्रराजे आज दिलासा देणार का?

गेली तेरा ते चौदा वर्षे झाले या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रडगाणे अजून कायम आहे. कांटे ते वाकेड आणि आरवली ते वाकेड या टप्प्यांचे दुष्टचक्र काही संपलेले नाही. ६ वर्षांमध्ये ३ ठेकेदार बदलले तरी कांटे ते वाकेड या ४९ किमीच्या टप्प्यांपेकी ९ किमीचा टप्पा अजून शिल्लक आहे. तर आरवली ते वाकेडमधील ४१ किमीपैकी १० किमीचा टप्पा शिल्लक आहे. यापूर्वीच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अनेक प्रयत्न करूनही या महामार्गाचे काम काही पुर्ण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे हे या महामार्गाची पाहणी करणार असून नवे बांधकाम मंत्री या हायवेबाबत काही दिलासा देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले रत्नागिरी दौऱ्यावर असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे. यापूर्वीचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील मुंबई-गोवा राष्ट्रीय महाम ार्गाचे काम पुर्ण होण्याच्यादृष्टीने अनेक दौरे केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या दौऱ्यातून हाती काय पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१४ वर्षे रखडले काम – गेली तेरा ते चौदा वर्षे झाले या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. अजूनही कांटे ते वाकेड या ४९ किम ीच्या टप्प्यातील ९ किमी रस्त्याचे काम शिल्लक आहे. तर आरवली – वाकेड या ४१ किमीपैकी १० किमीचे काम बाकी आहे. या दोन्ही टप्प्यांचे काम गेली ६ वर्षे रखडले आहे. या ६ वर्षांमध्ये ३ ठेकेदार बदलले तरी अजून काम अपूर्णच आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. भोसले कामाला गती मिळावी, यासाठी ठेकेदार कंपन्यांना काय सूचना करणार कि टाईम बॉण्ड देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ठेकेदारांचे सुमारे २५० कोटी रुपये थकीत – रत्नागिरी आणि चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेद्रांनी कोट्यवधीची शासकीय कामे केली आहेत. मार्च २०२४ पासून झालेल्या विविध विकास कामांचे त्यांना तुटपुंजे पैसे मिळाले. परंतु अजूनही त्यांचे हात आर्थिक दगडाखाली सापडलेले आहेत. या ठेकेदारांनी केलेल्या कामांचे शासनाकडुन सुमारे २५० कोटी रुपये येणे बाकी आहेत. या कामांसाठी बँक गॅरंटी, त्यांची पत जाण्याची वेळ आली तरी अजून शासनाकडुन त्यांची देयके मिळालेली नाहीत. त्यामुळे नवीन कामे घेण्यास एकही ठेकेदार तयार नाही. अशा या नाजूक परिस्थितीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री काय पर्याय काढणार का, याकडे ठेकेदारांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

Most Popular