29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeMaharashtraघंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करु नका-...

घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करु नका- महापौर किशोरी पेडणेकर

सार्वजनिक दहीहंडी प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर केलेल्या घणाघाती टीकेविरोधात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दहीहंडी सणाबद्दल बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, स्वतःच्या राजकीय पक्षाच्या पोळ्या भाजून घेणारे, पण आम्ही मात्र लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दिखाउपणा करतात. मात्र एवढ मात्र नक्की कि यांनी कोणाच्याही भावनेचा नाही तर, लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा.

जेव्हा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा सरकार कसे निष्क्रिय ठरते आहे हे सांगण्यासाठी अनेक बैठका घेऊन आरोप प्रत्यारोप करत राहतात आणि संकटकाळी मात्र हे सगळे बीळात जाऊन लपतात,  असा टोला किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना लगावला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर केलेल्या टीकेला महापौर पेडणेकर यांनी चांगलाच लक्ष केल आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी राजरोसपणे सुरु असतात, मात्र कोरोना संसर्गाची दुसरी, तिसरी लाट येण्याचे सांगत घाबरवलं जातं आहे. गदा कायम हिंदूंच्या सणांवरच का येते?  तसेच कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून म्हणजेच मागील दीड वर्षापासून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. जर ती लवकरात लवकर उघडण्यात नाही आली तर, मनसे प्रत्येक मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या या घंटानादाच्या इशाऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करु नका, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटल आहे.

RELATED ARTICLES

Most Popular