24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraशक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिला निर्णय

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिला निर्णय

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कासीम बंगाली, सलिम अन्सारी, विजय जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावलेली. याबाबत तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती.

हायकोर्टाने तीनही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून, त्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेमध्ये केले आहे. २०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. हि घटना घडली तेव्हा लोकांचा संताप अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टाने यावेळी नमूद केल आहे.

२२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पेशाने छायाचित्रकार असलेली हि महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटोग्राफी करण्यासाठी तेथे गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्या सहकार्य समोरच हाथ पाय तोंड बांधून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

हे प्रकरणामुळे संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी सलिम अन्सारी, सिराज खान, विजय जाधव, कासीम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला देखील अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांसाठी फाशीची शिक्षा सुनावली होती. तर त्या अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.

मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. हायकोर्टाने आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान आज निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून त्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular