20.6 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriमुंबई ते रत्नागिरी ३२६ किमीचा प्रवास आता केवळ एका तासात

मुंबई ते रत्नागिरी ३२६ किमीचा प्रवास आता केवळ एका तासात

६ ते ७ महिन्यांत विमानतळ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार होईल.

नेहमीच त्रासदायक प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक गूड न्यूज आहे. महाराष्ट्रातील नवीन विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील हे विमानतळ आहे. रत्नागिरीतील हे विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार आहे. यामुळे मुंबई ते रत्नागिरी ३२६ किमी.चा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. रत्नागिरी विमानतळ सुरू झाल्यामुळे मुंबई आणि कोकणमधील प्रवास आता फक्त एक तासात पूर्ण होईल, असे ना. उदय सामंत म्हणाले. मुंबई ते रत्नागिरी हे अंतर अंदाजे ३२६ किलोमीटर आहे. रस्त्याने गेल्यास अंतर पूर्ण करण्यास ७ ८ तास लागतात. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे खराब स्थितीमुळे, रस्त्याने प्रवासाचा वेळ आणखी जास्त आहे. तर रेल्वेने गेल्यास देखील मुंबई ते रत्नागिरी प्रवासासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागतो. ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाबाबत अपडेट दिली.

पुढील ६ ते ७ महिन्यांत विमानतळ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार होईल. एप्रिल २०२६ पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल. याव्यतिरिक्त, रत्नागिरी फ्लाइंग क्लबची स्थापना केली जाईल, ज्यामुळे या प्रदेशात एरोबॅटिक शिक्षण आणि लहान विमानांच्या ऑपरेशनसाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील. जपानमधील ओसाका शहरात ओसाचा वर्ल्ड एक्सपोमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन झालं. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत आणि महाराष्ट्र उद्योग विभागाचे शिष्टमंडळ यांनी महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन केलं. राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, नवउद्योजकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा… महाराष्ट्र राज्याची संस्कृती उद्योग आणि विकास हा जगभरात पोहोचावा यासाठी या पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलंय. पैठणीपासून ते कोल्हापूरच्या कोल्हापुरी चप्पल आणि कोकणातील छोट्या उद्योगांचं सादरीकरण करण्यात आलं.

RELATED ARTICLES

Most Popular