कोकण रेल्वे प्रत्येक सणासुदीच्या कालावधीमध्ये विशेष गाड्यांची व्यवस्था करत असते. परंतु, त्यामध्ये सुद्धा अनेक अटी शर्थी सुद्धा टाकाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले. गणपती मध्ये नागपूर-मडगाव-नागपूर ही साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात आली. गणपतीच्या काळात संगमेश्वर रोड स्थानकामध्ये सदर गाडीला थांबा होता. सदर गाडी गेली २ वर्षांपासून विशेष कारणासाठी सुरू आहे. आता त्या गाडीला ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.
त्यानंतर मिळालेल्या माहितीमध्ये हि विशेष गाडी आता कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असल्याची बातमी पुढे आली परंतु, या गाडीचा संगमेश्वर रोड थांबा काढण्यात आला आहे. नेत्रावती-मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांसाठी सुरू असलेले आमचे आंदोलन संपूर्ण संगमेश्वर तालुक्याला माहीत आहे. एक वेळा आम्ही उपोषण केले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आंदोलन नको असे मान्यवर मंडळींनी विनंती केली म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतले. परंतु कोकण रेल्वेचा कोकणाबद्दल दुजाभाव चालू आहे.
सदर गाडीचा संगमेश्वर रोड स्थानकातील थांबा काढण्यामागचे कारण काय ते समजू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आंदोलनासाठी स्थानिक जनताच आक्रमक झाली आहे. या संदर्भात कोकण रेल्वेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून आता आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळात नाही, तसेच मागणी मान्य झाली नाही, तर परत एकदा तीव्र उपोषणाच्या आंदोलनाचे धोरण आखावे लागेल व होणार्या परिणामाला निव्वळ कोकण रेल्वेच जबाबदार असेल असे ग्रुपचे प्रमुख व पत्रकार संदेश जिमन यांनी स्पष्ट केले आहे