रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर ओढवलेल्या संकटाच्या काळात अनेक नेते मंडळी घटनास्थळी दाखल झाली आहेत. अनेकांनी घटनेनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तळीये गावाला भेट दिली. दुर्घटनास्थळाची पाहणी करुन, नागरिकांना धीर देऊन, नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेंव्हा ते म्हणाले की, जे गेले त्यांना परत आणणे शक्य नाही, परंतु जे या दुर्घघटनेतून वाचले आहेत. त्यांना सांभाळण्याचं काम आम्ही निश्चितच करू, असं नारायण राणे म्हणाले.
घडलेली दुर्घटना अतिशय दुःखद आहे, जे या सगळ्यातून वाचले आहेत, त्यांनी स्वतः खंबीर होणे गरजेचे आहे. तुमचं सर्व पुनर्वसन आम्ही करू. केंद्र सरकारकडून आधीच मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी मला घटनास्थळाची पाहणी करून, अहवाल देण्यास सांगितलं आहे. सध्या तरी प्रशासन ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम वेगाने करत आहे. त्याचबरोबर त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम देखील केलं जात आहे.
पत्रकार परिषदेमध्ये यावेळी राज्य सरकारशी यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला असता, त्यावर बोलताना राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे की, ‘राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत’, अशा शब्दात राणे यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.