25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeSindhudurgनारायण राणे एका बिथरलेल्या वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो...

नारायण राणे एका बिथरलेल्या वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो व्हायरल

फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक दाखवली असून, हा वाघ या बँकेत शिरण्याचा प्रयत्न करु पाहतोय. मात्र मंत्री नारायण राणे वाघाला त्याची शेपटी धरून बाहेरचा रस्ता दाखवताना दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजपचा दमदार विजय होऊन महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. जाहीर झालेल्या १९ जागांपैकी भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या असून, जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली पराभूत झाले आहेत.

गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सिंधुदुर्ग येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरु झाली. यात महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. त्यांच्या विरोधात राणे गटातील विठ्ठल देसाई होते. दोघांनाही १७-१७ मते पडल्याने टाय झाले. पण चिठ्ठी काढून विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा बँकेची निवडणूक जिंकत शिवसेनेचा पराभव केला. विजयामुळे भाजप चांगलाच ऐटीत असून, शिवसेनेला हा मोठा धक्काच बसला असल्याचं म्हटलं जातं आहे. भाजपच्या या अभूतपूर्व यशामुळे सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीम्स तसेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये नारायण राणे एका बिथरलेल्या वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल करण्यात आला आहे.

फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक दाखवली असून, हा वाघ या बँकेत शिरण्याचा प्रयत्न करु पाहतोय. मात्र मंत्री नारायण राणे वाघाला त्याची शेपटी धरून बाहेरचा रस्ता दाखवताना दिसत आहे. या वाघाला राणे बँकेपर्यंत पोहोचू देत नसल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे. नितेश राणेंच्या मिसिंग फोटोचा हा एक प्रकारचा बदला घेतल्याचे दिसून येत आहे. एक प्रकारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular