29.9 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे...

दापोलीत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले...

मिरकरवाडा जेटीवर मतदानामुळे शुकशुकाट – मच्छीमारांची सुटी

शहरात तसेच नजीकच्या परिसरात लोकशाही महोत्सवात मतदान...
HomeKokanनैसर्गिक आपत्तींमुळे मच्छीमार उद्ध्वस्त होण्याची वेळ

नैसर्गिक आपत्तींमुळे मच्छीमार उद्ध्वस्त होण्याची वेळ

मंदोस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्रातील जेलीफिशचे आक्रमण संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आणि स्थानिक मासेमारी व्यवसायावर झाले आहे

कोकण किनारपट्टीवर मंदोस चक्रीवादळामुळे विशेष परिणाम झाला नसला तरी, वातावरणामध्ये मात्र काही प्रमाणात उलथापालथ झाली आहे. मासेमारी व्यवसायावर काही प्रमाणात याचा दुष्परिणाम पाहायला मिळत आहे. मागील २-३ वर्षे किनारपट्टीतील मच्छीमार बांधव नैसर्गिक संकटांमुळे पुरता कोलमडलेला आहे. आणि वारंवार येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तींमुळे मच्छीमार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

कित्येक वर्षे शासन दरबारी धूळखात पडलेले मच्छीमारांचे प्रश्न आश्वासनांच्या फेऱ्यात सापडलेले असतानाच निसर्गनिर्मित आपत्त्या किनारपट्टीचे नुकसान करत आहेत. मंदोस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्रातील जेलीफिशचे आक्रमण संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आणि स्थानिक मासेमारी व्यवसायावर झाले आहे, त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. कोकण किनारपट्टीवरील मासेमारीसाठी जेलीफिशचे नवे संकट अचानक उध्दभवल्याने मासेमार चिंतेत पडले आहेत.

हे विषारी जेलीफिश प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर आढळून येत आहेत. यापूर्वी अपवाद वगळता फारसे कधी न आढळलेले विषारी जेलीफिश कोकण समुद्रकिनाऱ्यावर आढळून येऊ लागले आहेत. सध्या विषारी जेलीफिश माशांची संख्या बळावली असल्याने समुद्रकिनारी बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. आधीच मत्स्यदुष्काळ असताना बोटी नांगरण्याची वेळ आल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नदेखील ऐरणीवर आला आहे.

कोकणातील मच्छीमार मच्छीमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातात. त्यांना मासळीही तितक्याच विपूल प्रमाणात मिळते; परंतु मागील काही दिवसांपासून मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये विषारी असे जेलीफिश आढळून येत आहेत. आणि सरसकट करण्यात येणाऱ्या मासेमारीचा परिणाम मत्स्य साठ्यावर होऊन उरलीसुरली मासळी नष्ट होत आहे. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या मच्छीमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. मासेमारी ठप्प असल्याने मच्छीमारांसमोर आर्थिक समस्या निर्माण होत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular