सोशल मीडियावर नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्नाच्या ४ महिन्यानंतर सरोगसी द्वारे मुलांना जन्म देण्यावरून काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. जूनमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यातच नयनताराने दोन मुलांना जन्म दिला आहे. यानंतर तिनं केलेल्या सरोगसीवरुन तिच्यावर टीका करण्यात आली. तिनं सरोगसीच्या काही नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर तामिळनाडू सरकारनं या विषयासाठी तीन जणांचे पॅनल नियुक्त केले होते. त्यांचा अहवाल आता समोर आला आहे.
त्या अहवालातील माहितीप्रमाणे असे म्हटले आहे की, सरोगसी आईने नोव्हेंबर २०२१ मध्ये एका जोडप्यासोबत करार केला होता. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये तिच्या उदरात भ्रुण ठेवण्यात आले. ऑक्टोबरमध्ये तिनं मुलाला जन्म दिला. भारतात कमर्शियल सरोगसी ही २०२१ अॅक्टनुसार बॅन करण्यात आली आहे. तो गेल्या वर्षीपासून लागु करण्यात आला आहे.
नयनतारा आणि विघ्नेशच्या टाईमलाईनकडे पाहता त्यांनी ज्यावेळी सरोगसीची प्रोसेस सुरु केली होती त्यावेळी ती सगळी प्रोसेस कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. विघ्नेश आणि नयनताराच्या प्रकरणावर सुनावणीसाठी ज्या पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी संबंधित रुग्णालयावर कडक शब्दांत सुनावले आहे. त्यांनी नयनताराचे रेकॉर्ड यासाठी ठेवले होते की, ते चुकीचे आहे. त्यामुळे वाद हा आणखीनच वाढला आणि गोंधळ निर्माण झाला. याप्रकरणात आता रुग्णालयाला नोटीस पाठवण्यात आली आहे.
विघ्नेश आणि नयनतारानं रजिस्टर पद्धतीने लग्न याआधी केले आहे. आणि या वर्षी जूनमध्ये त्यांनी कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला बॉलीवूडमधील रजनीकांत, शाहरुख खान, विजय सेतूपती आदी दिग्गज उपस्थित होते.

