29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeRatnagiriहरचिरीत होणार नवीन धरण, एमआयडीसी'तर्फे १२ कोटी मंजूर

हरचिरीत होणार नवीन धरण, एमआयडीसी’तर्फे १२ कोटी मंजूर

नव्या धरणामुळे सुमारे १०० एमएलडीहून अधिक पाणीसाठा होणार आहे.

तालुक्यातील हरचिरी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नवीन धरण मंजूर केले आहे. सुमारे १२ कोटींचा खर्च यासाठी येणार असून, गळती लागलेल्या जुन्या धरणाच्या खालील बाजूस हे धरण बांधले जाणार आहे. पहिल्या धरणाची साठवण क्षमता ०.२७९ दशलक्ष घनमीटर होती. नव्या धरणामुळे सुमारे १०० एमएलडीहून अधिक पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या ग्राहकांची भविष्यातील पाणीटंचाईची चिंता मिटणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. जुन्या धरणातील गेल्या ३० ते ३५ वर्षे गाळच काढला गेलेला नाही. गाळ साठून या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे.

तसेच, धरणाला गळती असल्याने त्यावर खर्च करण्याऐवजी या धरणाच्या पुढच्या बाजूला काही अंतरावर हे नवीन धरण बांधले जाणार आहे. ‘एमआयडीसी’ने त्याबाबतचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी सादर केला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याचा पाठपुरावा करून धरणासाठी १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला पन्नास मीटर अंतरावर हे नवे धरण बांधले जाणार असून, त्याची भिंत चार मीटर उंचीची असेल. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. दरवर्षी मे महिन्यामध्ये पाण्याचे नियोजन करावे लागते. हा प्रश्न नव्या धरणामुळे सुटणार आहे. ‘एमआयडीसी’च्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर पद्धतीचे पाच बंधारे आहेत.

काजळी नदीवर ही धरणे उभारली आहेत. घाटीवळे, आंजणारी, असुर्डे, निवसर आणि हरचिरी अशी त्यांची नावे आहेत. ‘एमआयडीसी’कडून कुवारबाव, नाचणे, कर्ला, मिऱ्या, पोमेंडी बुद्रुक, चिंद्रवली, मिरजोळे आणि शिरगाव यांसह ९ ग्रामपंचायती, रत्नागिरी पालिकेला आणि एमआयडीसीतील ७८० प्लॉटधारक, उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतींना प्रतिदिन १.८ एमएलडी आणि पालिकेला दीड एमएलडी प्रतिदिन पाणीपुरवठा होतो; परंतु मुख्य धरण असलेल्या हरचिरी धरणाला मोठी गळती आहे. तसेच, गेल्या ३० वर्षांपासून त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही. मुळे हा नवीन धरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular