29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरेल्वे प्रवाशांना लवकरच एसटीची नवी सेवा - प्रज्ञेश बोरसे

रेल्वे प्रवाशांना लवकरच एसटीची नवी सेवा – प्रज्ञेश बोरसे

रत्नागिरी स्थानकावर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत एसटीचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

रत्नागिरी रेल्वेस्थानक आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच एसटीची नवी सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती एसटीचे रत्नागिरीचे विभागीय व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे श्री. बोरसे यांना रेल्वे प्रवाशांना एसटीची सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध होण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी श्री. बोरसे यांनी ही माहिती दिली. कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणात येतात. गणेशोत्सवात तर ही संख्या लाखाच्या पुढे जाते. मात्र सर्वच रेल्वे स्थानके वाहतुकीच्या मुख्य मार्गापासून दूर आहेत.

खेड, चिपळूण आणि रत्नागिरी ही स्थानके एसटी वाहतुकीच्या मार्गाच्या जवळ असली तरी एसटीच्या गाड्या रेल्वेस्थानक मार्गे वळविल्या जात नाहीत. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांना डोक्यावरून बोजे वाहत मुख्य मार्गावरील बस थांब्यावर यावे लागते. मुंबईकडे जाताना मुख्य मार्गावरील बस थांब्यावरून त्याच पद्धतीने रेल्वे स्थानकाकडे जावे लागते. यासाठी प्रामुख्याने खेड, चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकांच्या जवळून जाणाऱ्या महामार्गावरील एसटीच्या सर्व बस गाड्या रेल्वेस्थानक मार्गाने वळविण्यात याव्यात.

अनेकदा नाइला जास्तव रिक्षाचे मनमानी भाडे देऊन त्यांना प्रवास करावा लागतो. एसटीने योग्य ती सेवा दिली तर त्यांचा त्रास वाचेल व एसटीच्या उत्पन्नातही नक्कीच भर पडेल. याबाबत एसटीच्या अनेक प्रवाशांकडून ग्राहक पंचायतीकडे विचारणा झाल्याने त्यांच्या वतीने हे निवेदन देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्री. बोरसे यांनी सांगितले की, या मागणीची पूर्तता गणेशोत्सवाच्या काळात तरी करण्यात आली आहे.

रत्नागिरी स्थानकावर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत एसटीचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याकरिता रेल्वेने मोफत जागा आणि विद्युत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्थानकाच्या जवळून महामार्गावरून जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या रेल्वे स्थानक मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष संदेश सावंत, सचिव आशीष भालेकर, सहसंघटक उमेश आंबर्डेकर, प्रसिद्धीप्रमुख प्रमोद कोनकर, सदस्य दिलीप कांबळे यांनी निवेदन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular