रत्नागिरीमध्ये अद्ययावत सुविधांनी युक्त असे हॉस्पिटल उपलब्ध नाही आहे. काही प्रमाणात आहेत पण जर पुढील अधिक उपयुक्त उपचारांसाठी डॉक्टरच कोल्हापूर, मुंबई किंवा पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये पेशंटला हलवायला सांगतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये अशी अद्ययावत सुविधा असणारे हॉस्पिटल असणे गरजेचे आहे. किंवा जे आधी होते त्याची तरी दुरुस्ती करून अद्ययावत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
रत्नागिरी जिल्हयातील गुहागरमध्ये एनरॉन प्रकल्पाबरोबर एक अद्यावत आणि सुसज्ज असे निरामय हॉस्पिटल सुरु करण्यात आले होते. मात्र कालांतराने ते काही काळातच बंद करण्यात आले. हे रुग्णालय पुन्हा सुरु होणे गरजेचे असून उत्तर रत्नागिरीसाठी निरायम हॉस्पिटल निश्चितच उपयुक्त ठरू ठरेल. हे हॉस्पिटल पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंकडे मागणी केली जाणार आहे. लघु उद्योगमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ना. नारायण राणे हे यासाठी निश्चितच प्रयत्न करतील अशी आशा सर्व कोकणवासियांना लागून राहिली आहे.
निरामय हॉस्पिटलमुळे दापोलीपासून रत्नागिरीपर्यंत अनेक रुग्णांना त्याचा चांगला फायदा होण्यास मदत होणार आहे. सागरी महामार्गावरील हे विस्तीर्ण परिसर असलेले एक अत्यंत महत्वाचे हॉस्पिटल असून हे सुरु झाले तर नक्कीच कोकणवासियाना मदतीचे होईल. या ठिकाणी असणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्री अमेरिका, जपान, जर्मनी इत्यादी देशामधून मागविलेल्या असून. या ठिकाणी अजूनही उपलब्ध आहेत. काही प्रमाणात चांगल्या असून, काहींची डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र एनरॉन प्रकल्प इथून बंद झाला आणि त्याच्या सोबत हे हॉस्पिटल देखील बंद झाले. त्यामुळे जिल्ह्याची नड ओळखून ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नाम. नारायण राणे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.