22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeSindhudurgनितेश राणेंच्या वक्तव्याने ग्रामस्थ नाराज, केली गावातच प्रवेशबंदी

नितेश राणेंच्या वक्तव्याने ग्रामस्थ नाराज, केली गावातच प्रवेशबंदी

नितेश राणेंनी केलेल्या भाषणात आनंदवाडी गावाबाबत केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल,निषेध करणाऱ्या फलकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कार्याचा दबदबा आहे. परंतु अनेक वेळा त्यांच्या आणि त्यांच्या मुलांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याने गोंधळ उडतो. अति स्पष्टवक्तेपणासाठी राणे कुटुंबीय प्रसिद्ध आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी एका उद्घाटनाच्या वेळी केलेल्या वक्तव्याबद्दल कणकवली वैभववाडी देवगड मतदारसंघांचे भाजप आमदार नितेश राणेंच्या विरोधात देवगड आनंदवाडी इथे निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे.

गावात आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी असा बॅनरमधील मसुदा असून कमळ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात नितेश राणेंनी केलेल्या भाषणात आनंदवाडी गावाबाबत केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल,निषेध करणाऱ्या फलकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

देवगड तालुक्यातील कमळ चषक स्पर्धेदरम्यान नितेश राणे यांनी आनंदवाडी गावाची बदनामी केल्याचं बॅनरवर लिहलं आहे. आनंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञाताने हा बॅनर लावला आहे. देवगड हा नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे नितेश राणें यावर काय प्रतिक्रिया देणार या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विशेष म्हणजे कमळ चषकाच्या उद्घाटनाच्या भाषणात देवगडमधील आनंदवाडी गावाची बदनामी होईल असे वक्तव्य केलं असल्याचं म्हणत आनंदवाडी गावाने एकमताने निषेध करत आनंदवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या ठिकाणी निषेधाचे फलक लागल्याने देवगडसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देवगडमधील आनंदवाडीत सिंधुदुर्गामध्ये “म्याओ म्याओ” ड्रग्जची विक्री होते असं वक्तव्य केलं. यावेळी आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी, देवगड, कणकवलीमधील तरुण पिढी चुकीच्या मार्गाने वाटचाल करत असून “म्याओ म्याओ” ड्रग्ज १५ ते २० रुपयांना तरुणांना मिळतो. या वक्तव्याचा निषेध करत देवगड मधील आनंदवाडी ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गावामध्ये प्रवेश करण्यास बंदी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular