27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeIndiaनितीन गडकरी यांची विशेष घोषणा, कार पार्किंगविषयी नागरिकांना लागणार शिस्त

नितीन गडकरी यांची विशेष घोषणा, कार पार्किंगविषयी नागरिकांना लागणार शिस्त

रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि ५०० रुपये मिळवा

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेशिस्तपणे रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि ५०० रुपये मिळवा अशी महत्त्वपूर्ण घोषणा आज केली आहे. यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील इंडस्ट्रियल डीकार्बनायझेशन समिट या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.

आपल्या देशात अनेक शहरांमध्ये कार पार्किंगविषयी नागरिकांचा बेशिस्तपणा रस्तोरस्ती पाहायला मिळतो. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून आता अशा प्रवृत्तीविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.

नितीन गडकरी म्हणाले की, मी असा कायदा करणार आहे कि, जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला १००० रुपये दंड लावण्यात येईल. त्याच वेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. यामुळे पार्किंगची समस्या नक्कीच दूर होऊ शकेल,  असे गडकरी म्हणाले. अनेक लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवण्याऐवजी ते आपली वाहने रस्त्यावर उभी करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करतात, याबद्दल गडकरी यांनी खेद व्यक्त केला.

नितीन गडकरी म्हणाले की,  माझ्या नागपुरातील आचाऱ्याकडे दोन सेकंड हॅन्ड गाड्या आहेत, म्हणजे चार लोकांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. त्या तुलनेमध्ये बघायला गेले तर दिल्लीवाले खूपच सुखी आहेत. त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी आम्ही रस्ते बनवले आहेत, असे गडकरी यांनी मस्करीच्या स्वरात म्हटले. अनेक लोक आपल्या गाडीसाठी पार्किंगची सोय करत नाहीत, आणि रस्त्यावर उभी करून ठेवतात.

RELATED ARTICLES

Most Popular