राज्यात सर्वत्र वीजबिलावरून महावितरणाने सरळ जोडणीच तोडण्याचे काम हाती घेतले असल्याने थकीत वीजबिल धारकांची थेट जोडणीच तोडण्यात येत आहे. त्यामुळे बिल भरून पुन्हा वीज जोडणी पैसे भरून करावी लागत आहे. त्यामुळे ज्या राज्यात आता कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेला आहे, त्या राज्यातील ग्राहकासाठी महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजना आखण्यात आली या योजनेची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
महावितरणकडून राज्यभर वीजबिल वसुलीची मोठी मोहीम चालू आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. विलासराव देशमुख अभय योजना ऊर्जा मंत्री राऊत यांनी जाहीर केली आहे. सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास ५ टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास १० टक्के रक्कम माफ केली जाईल. यामध्ये मात्र कृषी पंप ग्राहकांना दिलासा देण्यात आलेला नाही.
महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट बनत चालली आहे. कोटीमध्ये थकीत विजबीलांचा बोजा आणि त्यात विजेसाठी अतिरिक्त करावा लागणारा खर्च लक्षात घेता, महावितरणाने हा सुवर्णमध्य काढला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकंडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर केली असून या योजनेचा लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना १ हजार ४४५ कोटी रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्यांना “अभय”, ऊर्जामंत्र्यांची घोषणा
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. विलासराव देशमुख अभय योजना ऊर्जा मंत्री राऊत यांनी जाहीर केली आहे
RELATED ARTICLES