पाकिस्तानमध्ये जवळपास १८ वर्षांनंतर क्रिकेट खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ पोहोचला होता. या दोन्ही संघादरम्यानच्या सामन्याचे आयोजन रावळपिंडी येथे करण्यात आले होते. सामना सुरू होण्याच्या आधी केवळ काही मिनिटांपूर्वीच खेळाडूंच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर हा सामना रद्द करण्यात आला. न्यूझीलंडच्या टीमनं सुरक्षेच्या कारणास्तव ही सीरिज न खेळण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सीरिज अचानक रद्द करण्यात आली.
न्यूझीलंडने खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची असल्याचे म्हटल्याने, दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डाने याबाबत संयुक्तिकपणे विचार करून हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या प्रकरणात केलेल्या मध्यस्थीचा देखील काही परिणाम झाला नाही. क्रिकेट विश्वात न्यूझीलंडनं हा दौरा अचानक रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयावरून खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने या विषया संदर्भात आयसीसीकडं दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंडची टीम विशेष विमानानं आपल्या मायदेशी माघारी परतली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमधील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीसीबीने ट्वीट करून म्हटले आहे कि, आम्ही येणाऱ्या सर्व संघासाठी “fool proof” व्यवस्था केली आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत काळजी करण्याचे काहीही कारण नव्हते. पाकिस्तानने केलेल्या एका fool च्या स्पेलिंग चुकीमुळे सर्व जगभरामध्ये स्वतचं हस उडवले जात आहे. अनेक युजर्सनी त्यावर विविध विनोदी ट्वीट करून पीसीबीची चेष्टा केली आहे.
या सर्व प्रकरणावर वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेलनं या विषयावर पाकिस्तानची बाजू मांडली असून, ‘मी उदया पाकिस्तानामध्ये जाणार आहे तर माझ्यासोबत कोण येणार आहे?’ असं ट्विट गेलनं केलं आहे. त्याचं हे ट्विट वेगानेच व्हायरल झालं आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरनं त्याला “तिथं भेटूया” असे गेलला प्रती ट्वीट केलं आहे.