रत्नागिरी हापूस आंब्याचा सध्या हंगाम सुरु असून, अनेक राज्यातून, देशांमधून मोठ्या प्रमाणात रत्नागिरीच्या हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सध्या वातावरणातील ऊन पावसाच्या खेळामुळे फळप्रक्रिया लांबणीवर गेली आहे. वातावरणातील वारंवार घडणाऱ्या बदलामुळे यंदाचा हापूस हंगाम पुढे सरकला आहे. शक्यतो मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अपेक्षित उत्पादन मिळायला सुरुवात होते, परंतु यंदा पणन, कृषी विभागाकडून हापूसची निर्यात वाढविण्यावर जास्तीत जास्त भर दिला गेला आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आंब्याच्या निर्यातीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होळीच्या मुहूर्तावर हापूसची पहिली शिपमेंट इंग्लंडला रवाना झाली आहे. आखाती देशांच्या पाठोपाठच रत्नागिरी हापूसच्या इंग्लडमधील निर्यातीला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ करण्यात आला आहे. बारामती येठून प्रथमच पॅक हाउसमधून साडेतीन हजार किलो आंबा पाठविण्यात आला आहे. या पहिल्या आंब्याला भारतीय चलनानुसार पाच डझनला १८०० ते १९०० रुपये दर मिळाला आहे.
पुण्यातील एका व्यावसायिकाने साडेतीन हजार किलोचा रत्नागिरी हापूस आंबा विमानमार्गे इंग्लंडला पाठविला. इंग्लंडमधील आयातदार तेजस भोसले हे दरवर्षी हापूसच्या विक्रीसाठी विशेष प्रयत्न करत असतात. यंदाही त्यांनी रत्नागिरीतील काही बागायतदारांशी थेट संवाद सुरू ठेवला आहे. त्याच बरोबर मुंबई-पुण्यातील व्यावसायिकांमार्फत ते आंबा इंग्लंडमध्ये विक्रीसाठी पाठवत असतात. १९ मार्चला हापूस तिकडे पोहोचला असून पहिल्या आंब्याला सर्वसाधारणपणे १८०० ते १९०० रुपये इतका दर मिळाला आहे.
समुद्रात उद्भवणाऱ्या वादळाचा धोका जरी रत्नागिरीला नसला तरी, दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात सूर्य देवतेचे दर्शन झालेले नाही, वातावरण संपूर्ण ढगाळ आहे. परंतु, अशा वातावरणाचा विपरीत परिणाम तयार होत असलेल्या हापूसच्या फळावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे दहा हजार पेटी आंबा वाशी मार्केटला रवाना होत आहे. तुलनेत हे प्रमाण यंदा कमी असले तरीही उत्पादनच कमी असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ”भारतामधून विविध प्रकारची भाजी कायम इंग्लंडला आयात केली जाते, यंदा हापूसचे बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हापूसची निर्यात लवकर सुरु झाली आहे.