दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी आपापल्या स्तरावर संसर्ग वाढू नये यासाठी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असताना आलेला हा नवा व्हेरीयंटने पुन्हा खळबळ मजली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला होता. या रूग्णावर मागील काही दिवसांपासून विशेष लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने देखील जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. या विषाणूची संसर्ग क्षमता अधिक असल्याने या कोरोना विषाणू बाबत आरोग्य यंत्रणा काळजीत होती.
या रूग्णाचं वय ३३ वर्षे असून तो व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेमधून कल्याण-डोंबिवलीत आला होता. काही शारीरिक त्रास जाणवल्यानंतर त्याने चाचणी करून घेतली असता, ती पॉझिटीव्ह आली आहे. त्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल होऊन त्याने योग्य वेळेत योग्य उपचार घेतल्याने तो रुग्ण आता व्यवस्थित बरा झाला आहे.
राज्यातील ओमिक्रोनचा पहिला रुग्ण योग्य उपचाराने बारा झाल्याने एक प्रकारची आल्हाददायक बातमी ऐकायला मिळाली आहे. ओमिक्रोन व्हायरसच्या बाबत पसरणाऱ्या अफवांना एक प्रकारे आळा बसला आहे. कोणत्याही आजारावर घरगुती प्रयोग करत न बसता, वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे. आज वेळेवर उपचार घेतल्याने त्या रुग्णाची प्रकृती एकदम बरी झाली असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. सध्या त्या रुग्णाला ७ दिवस विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. या दिलासाजनक वृत्ताची सविस्तर माहिती आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.