२० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठीदेखील निवडणूक होणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप या निवडणुकीत आणखी सहावा उमेदवारही उभा करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं आणखी टेन्शन वाढण्याचे संकेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेसाठी भाजपचे दोन उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड या पाच नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. पण भाजप आणखी सहा उमेदवार देखील या निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार आहे. सहावा उमेदवार हा पश्चिम महाराष्ट्रातून असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
माजी मंत्री पंकज मुंडे यांना भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी नाकारली आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी केला. देवेंद्र फडणवीस व चंद्रकात पाटील यांच्या विरोधात आकाशवाणी चौकात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांनी मात्र एका व्हिडियो मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंकज ताईना तिकीट मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु, सर्वांच्या निर्णयानुसार, नवीन लोकांना संधी देण्यात यावी अशी मागणी झाली.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या अनुषंगाने लाडवंजारी आणि ओबीसी समाजाच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात फडणवीस याच्या पोस्ट्स समोर टरबूज फोडून अनोखे आंदोलन करण्यात आले.