24.4 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeChiplunपरशुराम घाट २५ एप्रिलपासून ते २५ मे २०२२ पर्यंत ११ ते दुपारी...

परशुराम घाट २५ एप्रिलपासून ते २५ मे २०२२ पर्यंत ११ ते दुपारी ५ वाहतूक बंद

कामाला गती देवून पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याने त्याचप्रमाणे आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरु असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण जवळचा परशुराम घाट चौपदरीकरणाच्या कामासाठी बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत मंत्री दिलेल्या सूचना आणि प्रशासन यांच्यात विसंगता असल्याचं दिसून येत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी घाट वाहतुकीसाठी दुपारी १२ ते ५ या वेळेत दि. २० तारखेपासून बंद ठेवला जाईल, असे जाहीरपणे सांगितले होते. मंत्र्यांच्या या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून घाट बंद ठेवण्याच्या कोणत्याही सूचना प्रशासकीय अधिकार्‍यांना आलेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अद्याप कोणतेही सूचना दिलेली नसल्यामुळे जिल्हाधिकारी अद्याप आदेश काढू शकलेले नाहीत त्यामुळे  सध्या घाटातील वाहतूक सुरूच आहे.

चार दिवसांपूर्वी ना. उदय सामंत यांनी परशुराम घाटाचे काम दिवसा १२ ते ५ या वेळेत बंद ठेवून चौपदरीकरणाचे काम केले जाईल, असे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात बैठकही घेतली होती. त्यानंतर दि. २० पासून परशुराम घाट बंद ठेवण्याबाबत प्रांताधिकारी कार्यालयात खेड व चिपळूणचे तहसिलदार, महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर परशुराम घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु दोन दिवसानंतरही अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही आदेश आलेला नाही याबाबत जिल्हा प्रशासनाच्या संबंधितांची उशिरा तातडीची बैठक घेण्यात आली.

नागरिकांची सुरक्षा आणि कामाचा मंदावत असलेला वेग लक्षात घेऊन घातलेल्या अटींची पूर्तता करण्याच्या कार्यवाहीनंतर परशुराम घाट रुंदीकरणाचे काम २५ एप्रिलपासून ते २५ मे २०२२ पर्यंत घाटात दुपारच्या वेळात दुपारी ११ ते दुपारी ५ वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आला. या कामाला गती देवून पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याने त्याचप्रमाणे आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरु असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे या कामाला एक महिण्याचा कालावधी लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular