देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम अधिक वेगाने राबवण्यात येत आहे. मात्र या लसीकरणासाठी नागरिकांना सरकारने किंवा पालिकेने नेमून दिलेल्या केंद्रावर जाऊनच लस घ्यावी लागत आहे. केंद्र सरकारने आता घरच्या घरी कोरोना विरोधी लस देण्यास परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारने आता ‘डोअर टू डोअर’ लसीकरण करण्यास परवानगी दिली असून, यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनाही केंद्राने जाहीर केल्या आहेत. लसीकरणासाठी एक तर बरेच तास रांगेत उभे राहावे लागत आहे, किंवा त्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील ऑनलाईन वेळ पाळून सुद्धा अनेक वेळा प्रयत्न केल्यावरच नंबर लागतो. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया तशी खूपच डोकेदुखी ठरायला लागली होती. त्यामध्ये जर घरात कोण आजारी व्यक्ती असेल तर त्यांचे लसीकरण करायचे कसे! असा लसीकरणाचा मोठा प्रश्न निर्माण होत होता.
नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात घोषणा केली. त्यामुळे लसीकरणासाठी आता आजारी, शारिरीक दृष्ट्या असक्षम नागरिकांना तासनतास रांगेमध्ये उभं राहण्याची गरज लागणार नाही. ज्या व्यक्ती दिव्यांग, आजारी, आजारपणामुळे अंथरूणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांसाठी घरीच कोरोना लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या वाढण्याच्या काळामध्ये केंद्राकडे अनेक वेळा हि घरोघरी जाऊन मागणी लसीकरण मोहीम राबविण्यासाठी परवानगी मागितली जात असताना टी नाकारण्यात आली, अखेर आता डोअर तो डोअर लसीकरण मोहिमेला मान्यता देण्यात आली आहे.