शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी संशयित नेपाळी महिला गेल्या ६ महिन्यांपासून वास्तव्याला असल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलेला शुक्रवारीत न्यायालयांत हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर प्लॉट मालक सुनील कुमार गणपत प्रभू यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. एमआयडीसी येथील ई-६९ या प्लॉटवर देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिका गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला. त्यावेळी संशयित नेपाळी महिलेला पोलिसांनी अटक केली. ती पुणे येथील दोन महिला घेऊन हा देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे.
या दोन महिलांची पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता केली. संशयित महिलेला शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तिच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संशयीत महिलेने १५ सप्टेंबरला पुण्यातून दोन महिला घेऊन आली होती. ३ दिवसांनी या ठिकाणी कारवाई केली गेली. या दरम्यानं २ ग्राहक येऊन गेले. त्यांच्याकडून २हजार ५०० प्रम ाणे पैसे घेण्यात आले. यापैकी संशयीत महिलेला प्रत्येकी १ हजाररुपये मिळाले. उर्वरीत पैसे कोणी घेतले याची आता पोलिस सखोल चौकशी करत आहेत. संशयित नेपाळी महिला विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी प्लॉट मालकाला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. पोलिसांनी छापा टाकलेल्या प्लॉट हा सुनील कुमार गणपत प्रभू यांच्या नावावर आहे. त्यांना तो १९९१ इंडस्ट्रीज वापरासाठी विक्री करण्यात आला होता. मात्र या ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर प्लॉट मालकाला महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

