27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraदेहूमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विशेष पगडी आणि उपरणे

देहूमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विशेष पगडी आणि उपरणे

या पगड्या वैशिष्ट्यपूर्ण बनविण्यासाठी खास रिसर्च करण्यात आला असून त्या माध्यमातून या पगड्या आणि उपरणे तयार करण्यात येत आहेत.

१४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूमध्ये येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मोदींची ही भेट विशेष बनविण्यासाठी देवस्थान संस्थेतर्फे सध्या तयारी सुरू आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून मोदींसाठी खास दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्यात येत आहे.

देहू संस्थांन विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्या कलावर्कशॉपमध्ये या पगड्या तयार केल्या जात आहे. या पगड्या वैशिष्ट्यपूर्ण बनविण्यासाठी खास रिसर्च करण्यात आला असून त्या माध्यमातून या पगड्या आणि उपरणे तयार करण्यात येत आहेत. पारंपरिक पद्धतीने या पगड्यांवर हस्तलीखीत गाथा कारागीरांनी लिहिली असून या माध्यमातून संपूर्ण जगात तुकोबांचे विचार पोहचवण्याचा मानस असल्याची माहिती मुरूडकर झेंडेवाले यांनी दिली.

देशाच्या पंतप्रधानांना तुकाराम महाराजांच्या विचारांची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी आम्ही बनवणार आहोत. तुकाराम महाराज हे संत होते. या साठी त्या काळी जे कापड ही पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड आम्ही वापरणार आहोत. ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे, ती घातल्यावर गंध आणि टीळा हा वेगळा लावण्याची गरज पडत नाही. या साठी विशिष्ट पद्धतीने याची बांधणी आम्ही करणार आहोत.

मुरूडकर झेंडेवाले यांचा फेटे वनविण्याचा तिन पिढ्यांपासूनचा व्यवसाय आहे. तेव्हा पासूनचे हे काम आजही अविरतपणे सुरू आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांचा फेटा अनेकांनी विविध कार्यक्रमात परिधान केला आहे. बारशा पासून राजकीय कार्यक्रमापर्यंत सर्वांना फेटे आणि पारंपारिक कपडे दिले जातात. आतापर्यंत इंग्लडचे प्रिन्स चार्ल्स यांनी ही त्यांचे फेटे परिधान केला आहे. अमिताभ बच्चन, अटल बिहारी वाजपेयी तसेच बाजीराव मस्तानी चित्रपटासाठी त्यांनी विशेष फेटे डिझाईन केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular