26.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraबदल्यांबाबतचा अहवाल लीक झाल्या प्रकरणी, देवेंद्र फडणवीसांची दोन तास चौकशी

बदल्यांबाबतचा अहवाल लीक झाल्या प्रकरणी, देवेंद्र फडणवीसांची दोन तास चौकशी

आपण अधिवेशनात सरकारचे घोटाळे उघड केल्यामुळेच आपल्याला चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा देखील फडणवीसांनी केला आहे.

मुंबई पोलिसांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. सीआरपीसी १६० अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याच्याशीच निगडीत प्रकरणात फडणवीसांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यावेळी फडणवीस म्हणाले कि, विरोधी पक्षनेता असल्याने माझ्या माहितीच्या स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही, हा आपल्याला विशेषाधिकार आहे. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरीही त्यांनी तपासामध्ये माझं सहाय्य मागितलंय,  आणि मी ते देईन असं त्यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा अहवाल लीक झाल्या प्रकरणात पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा राज्यातील भाजपा कडून तीव्र निषेध करण्यात येत असून चिपळूण मध्ये निलेश राणेंनी फडणवीसांना आलेल्या नोटीसीची होळी केली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज्य सरकारवर आणि पोलिसांवर घणाघाती आरोप केले आहेत. तसेच, आपण अधिवेशनात सरकारचे घोटाळे उघड केल्यामुळेच आपल्याला चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा देखील फडणवीसांनी केला आहे.

“राज्यात बदल्यांचा जो महाघोटाळा झाला, त्याची सगळी माहिती मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली. त्यावर सर्वोच्च न्याययालयाने शिक्कामोर्तब केलं. याचाच अर्थ, महाघोटाळा हा घडलाच आहे, म्हणूनच सीबीआय त्याची चौकशी करतेय. हा घोटाळा का घडला? याची चौकशी हे सरकार यासाठी करू शकत नाही, कारण महाघोटाळ्याचा अहवाल सहा महिने आघाडी सरकारने दाबून ठेवला. मी जर तो बाहेर काढला नसता,  तर कोट्यवधींचा घोटाळा दबून गेला असता”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular