25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraनाशिककरांना अनोखा अनुभव, पोलीस ऑन ड्युटी फुल टाइट

नाशिककरांना अनोखा अनुभव, पोलीस ऑन ड्युटी फुल टाइट

तक्रार करण्यासाठी नाशिककर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डी. के. नगर पोलीस चौकीमध्ये तक्रार करण्यासाठी गेले असता, तिथे पोलिसच दारुची पार्टी करताना आढळून आले.

नाशिक येथील गंगापूर येथे एक आगळीवेगळीच परिस्थिती काल स्थानिकांनी अनुभवली आहे. रक्षकच पोलीस स्थानकात दारू पार्ट्या करत असतील तर प्रत्यक्षदर्शीनी आपली कैफियत तरी कोणाकडे मांडायची अशी अवस्था नाशिककरांची झाली आहे.

घडले असे कि, गंगापूर रोड परिसरातील स्थानिक नागरिक रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा करत होते. त्या टवाळखोरांची तक्रार करण्यासाठी नाशिककर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डी. के. नगर पोलीस चौकीमध्ये तक्रार करण्यासाठी गेले असता, तिथे पोलिसच दारुची पार्टी करताना आढळून आले. हा सगळा प्रकार स्थानिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी तेथील रेकोर्डिंग करणाऱ्या एका नागरिकाला मारहाण देखील केल्याचा आरोप केला जात आहे.

स्थानिकांनी पोलीस स्थानकातील हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकोर्ड करण्यास सुरुवात केली, तेंव्हा पोलिसांनी तिथून पळ काढण्यास सुरुवात केली. एवढंच नाहीतर मद्यधुंद अवस्थेत असताना , कसले भान न राखता आक्रमक होत त्यांनी एका नागरिकाला मारहणही केल्याचा दावा स्थानिक करत आहेत. दरम्यान,  जनतेचं रक्षण करणारे पोलीस, जर स्थानकातच दारु पिऊन हंगामा करत असतील,  तर सर्वसामान्य जनतेने आपल्या समस्या,  तक्रारी, अडचणी नेमक्या मांडायच्या तरी कुठे? असा यक्ष प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणं गाठावं तर पोलिसच दोन तीन पेग रिचवलेले सापडावेत,  असा अनोखा अनुभव नाशिककरांना आला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के.नगर चौकीमध्ये ऑन ड्युटी दारु पार्टी करताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. आता या दारूड्या पोलिसांवर आणि टवाळखोरांवर नक्की कोण आणि काय कारवाई केली जाते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

Most Popular