24.6 C
Ratnagiri
Friday, November 28, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriमहायुती म्हणून लढण्याची तयारी करा बैठकीत ना. उदय सामंतांच्या सूचना

महायुती म्हणून लढण्याची तयारी करा बैठकीत ना. उदय सामंतांच्या सूचना

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ जागा आहेत तर पंचायत समितीच्या ११२ जागा आहेत.

जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवत ठेवायचा असेल तर आपल्याला महायुती म्हणूनच लढावे लागणार आहे. महायुती म्हणून लढण्याची तयारी करा अशा स्पष्ट सूचना शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या. पाली येथील निवासस्थानी ना. उदय सामंत यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर कार्यकारिणी सदस्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार किरण सामंत हेही उपस्थित होते. यावेळी ना. सामंत यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांची मते जाणून घेतली. यावेळी सर्व तालुकाप्रमुख, संपर्कप्रमुख, संघटक, शहरप्रमुख व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यामध्ये महायुती असताना जिल्ह्यातही महायुती म्हणूनच सामोरे जावे लागणार असल्याचे ना. सामंत यांनी पदाधिकार्यांना सांगितले. काही जागा भाजपा, राष्ट्रवादीला सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे जी जबाबदारी पडेल ती प्रामाणिकपणे पार पाडायची असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ जागा आहेत तर पंचायत समितीच्या ११२ जागा आहेत. नऊ पंचायत समित्यांवर महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. जि.प. वरही महायुतीची सत्ता स्थापन झाली पाहिजे. राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. शिवसेना कार्यकर्ते कुठेही कमी पडता कामा नयेत असेही ना. सामंत यांनी बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.

रत्नागिरीतील प्रसिध्द विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून, याच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर रोजी होण्याच्या दृष्टीने ना. सामंत यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे १६ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत असून, याठिकाणी ते स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा कार्यकारिणी आणि सर्व बुथप्रमुखांशी संवाद साधणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular