25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriसार्वजनिक कार्यक्रमात वीजसुरक्षेला प्राधान्य द्या - महावितरण

सार्वजनिक कार्यक्रमात वीजसुरक्षेला प्राधान्य द्या – महावितरण

परिसरातील विद्युततारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन काहीच दिवसांत होणार असून, येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, तसेच घरगुती वीजपुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, याकरिता गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. वीज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजपुरवठ्याच्या वीजदरानेच वीजदर निश्चित केले आहेत.

त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे. या उत्सवाकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्थाही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सवात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना देखाव्यांचा आनंद घेता यावा मिरवणुकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युततारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular