27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriसमृद्ध कोकण संघटेनेचे उपोषण स्थगित…

समृद्ध कोकण संघटेनेचे उपोषण स्थगित…

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली.

कोकणातील पर्यटन, मच्छीमार, कृषी क्षेत्रावर झालेल्या अन्यायाविरोधात समृद्ध कोकण संघटना, स्वराज्यभूमी कोकण आंदोलनतर्फे सुरू असलेले बेमुदत उपोषण मंगळवारी (ता. २४) सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला. दरम्यान, संतप्त आंदोलकांनी जयस्तंभ येथे रास्ता रोको करत स्वायत्त कोकण झाला पाहिजे, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. संजय यादवराव, बावा साळवी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईसह कोकणात २५ जागांवर विधानसभेला समृद्ध कोकण संघटना उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा संजय यादवराव यांनी केली.

बेमुदत उपोषणामध्ये आंबा बागायदारांना कर्जमाफी मिळावी या मुख्य मागणीसह पर्यटन वाढण्यासाठी पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण करावे, कृषी क्षेत्रालाही चांगले दिवस यावेत, यासाठी आंदोलन करण्यात आले. ७५ वर्षे कोकण दुर्लक्षित आहे. ३८ टक्के उद्योग, प्रमुख बंदरे कोकणात आहेत. कोकण आर्थिक विकासाचा कणा आहे, तरी पायाभूत सुविधांची वानवा आहे. समृद्ध कोकण संघटनेने स्वायत्त कोकण हवे. शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होत नाही. म्हणून ठेकेदार बाजूला करून तज्ज्ञांचा यामध्ये समावेश करून निधीचा योग्य वापर करावा, अशी मागणी असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले.

कोकण विकास प्राधिकरण मंजूर आहे; परंतु त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. ही अनास्था संपावी यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. त्यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, स्वायत्त कोकण ही आमची प्रमुख मागणी आहे, ती शासनाने पूर्ण केली पाहिजे, अन्यथा आमचा लढा तीव्र करणार आहोत. सकारात्मक निर्णय घेतलात तर आम्ही सरकारला सहकार्य करू अन्यथा मुंबईसह कोकणात विधानसभेच्या २५ जागांवर कोकणभूमी उमेदवार उभा करेल, असे श्री. यादवराव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular