27.2 C
Ratnagiri
Sunday, July 27, 2025

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस समुद्र खवळला

हवामान विभागाने शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडेल,...

मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज…

गेले दोन महिने बंद असलेली मासेमारी १...

कर्जी खाडीपट्ट्यातील वीजपुरवठा सुरळीत…

महावितरणच्या खेड विभागातील लोटे उपविभागांतर्गत येणाऱ्या कर्जी...
HomeChiplun'कापसाळपर्यंत पुला'साठी जनमताचा रेटा हवा - आमदार शेखर निकम

‘कापसाळपर्यंत पुला’साठी जनमताचा रेटा हवा – आमदार शेखर निकम

महायुतीमधील शिष्टमंडळाची बैठक सावर्डे येथे झाली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणारा उड्डाणपूल हा कापसाळपर्यंत वाढवा, या मागणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या मागणीला जनमताचा रेटा वाढल्यास अधिक बळ मिळेल, असे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शहरातील प्रांत कार्यालय ते कापसाळपर्यंत उड्डाणपूल व्हावा, या मागणीसाठी आमदार निकम यांच्या उपस्थितीत महायुतीमधील शिष्टमंडळाची बैठक सावर्डे येथे झाली. या वेळी उपस्थितांनी विविध समस्या मांडल्या. त्यात लोकहिताचा विचार न करताच शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असून, त्या कामाचा दर्जा सुमार असल्याची तक्रार केली. नैसर्गिक पाण्याचा निचरा, जलवाहिन्या, चुकीचे भराव अशा समस्या आहेत. प्रांत कार्यालयापासून उड्डाणपुलाखालून न्यायालयाजवळ भिंत उभारण्यात येणार आहे. या द्वारे शहराचे विभाजन करण्याचे काम सुरू आहे. चुकीचे जोडरस्ते केले आहेत. पाग पॉवरहाऊस चौकाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. या कामामुळे अनेकांचे बळी जात आहेत तर अनेकजण अपघातात जायबंदी झाले आहेत. तेथील चुकीच्या नियोजनामुळे सुमारे सहा ते आठ हजार लोकवस्ती बाधित झाली आहे.

आठ शासकीय तालुका कार्यालये, शाळा, मुला-मुलींची वसतिगृहे, रुग्णालये, समाजभवन, मागासवर्गीय जनतेची व अल्पसंख्याकांच्या निवासी वाड्यावस्त्या बाधित होऊन रोज होणाऱ्या अपघातामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांना महामार्गावर जाणेच बंद किंवा त्यांना नेताना घरातील जबाबदार तरुणांना सोबत जावे लागते. परिणामी, जनजीवनावर याचा प्रचंड ताण पडत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर आमदार निकम म्हणाले, जनतेला हव्या असलेल्या वाढीव उड्डाणपुलाची मागणी केली आहे. जनतेची मागणी व भक्कम साथ मिळत असेल तर सर्वतोपरी प्रयत्न करू. या बैठकीला महायुतीचे समन्वयक उदय ओतारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, प्रशांत मोहिते, मंगेश जाधव, निहार कोवळे, बापू काणे, विजय चितळे, आशिष खातू, मनोज जाधव, सुयोग चव्हाण, विनोद पिल्ले, अभिजित सावर्डेकर, उमेश सकपाळ, अमोल कदम, प्रशितोष कदम, विशाल जानवलकर, समीर जानवलकर आदी उपस्थित होते.

निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू – मुंबई-गोवा महामार्गावर आवश्यक ठिकाणी तात्पुरते गतिरोधक, गती शिथिल फलक, डायव्हर्जन फलक, पंचायत समितीजवळ व पाग पॉवरहाउससमोर कायमस्वरूपाची पोलिसयंत्रणा उभी करण्याच्या सूचना दिल्या जातील. उड्डाणपुलासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार निकम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular