28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...
HomeMaharashtraपुण्यात इमारतीच्या स्लॅबच्या लोखंडी सापळा दुर्घटनेत ५ मृत्युमुखी

पुण्यात इमारतीच्या स्लॅबच्या लोखंडी सापळा दुर्घटनेत ५ मृत्युमुखी

याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई केली असून चार दोषींना ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबसाठी तयार करण्यात आलेला लोखंडी जाळ्याचा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू ओढवला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ब्लू ग्रास बिजनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शनवर सदस्य मनुष्यवधाचा आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई केली असून चार दोषींना ताब्यात घेतले आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुरुवारी रात्री लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला होता. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले होते. सीनियर सिटी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी, लेबर कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर मोहम्मद आलम, प्रोजेक्ट मॅनेजर असिस्टंट विजय धाकतोडे आणि प्रोजेक्ट मॅनेजर मजीत खान अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

मृत मजुरांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढ्या उशिरा रात्री का काम सुरु होते? या बद्दल तपास सुरु आहे.

अपघातात आपल्या नातेवाईकांना गमावलेले सर्व कामगार बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांवर नाराज दिसत होते. या दुर्घटनेत आपला पुतण्या गमावलेला मोहम्मद गुफ्रान म्हणाला,  “अपघात होऊन १२ तासांहून अधिक काळ उलटला,  पण अद्यापपर्यंत ना कंत्राटदार आला ना कंपनीचा कोणीही माणूस विचारपूस करायला आला.

RELATED ARTICLES

Most Popular