28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

मोकाट गुरांच्या समस्येकडे यंत्रणांची डोळेझाक…

रत्नागिरी शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढतच चालला...

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...
HomeMaharashtraचार वाहनांचा विचित्ररित्या अपघात, तिघांचा मृत्यू

चार वाहनांचा विचित्ररित्या अपघात, तिघांचा मृत्यू

आज पुण्यामध्ये नऱ्हे गावातील नवले पुलाजवळील भूमकर ब्रिजवर हा सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

अंतर्गत रस्ते आणि महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढले आहे. काही अपघात हे एवढे विचित्र तर्हेने घडतात कि, नक्की यामध्ये कोणी कोणाला ठोकले आणि अपघात झाला ! काही कळून येत नाही. पुण्यामध्ये ४ वाहनांचा अशा विचित्र प्रकारे अपघात झाला आहे कि, पाहणाऱ्याला सुद्धा एकदम आश्चर्य वाटेल.  

आज पुण्यामध्ये नऱ्हे गावातील नवले पुलाजवळील भूमकर ब्रिजवर हा सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. यामध्ये ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करताना भूमकर पुलाच्या उतारावरून आयशर ट्रक मागे सरकला. त्यावेळी त्याचे ब्रेक फेल झाल्याने, तो रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरून गेला. घटनेनंतर सिंहगड वाहतूक विभाग आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली असून ती सुरळीत करण्यात आली आहे.

मुंबईहून साताऱ्याकडे वाहतूक करणाऱ्या आयशरचा कंटेनरचा अचानक ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर आयशर उताराच्या दिशेने मागे सरकल्यानंतर ड्रायव्हरने घाबरून त्यातून उडी मारून पळून गेला. गाडी आहे त्या सुरु अवस्थेत तशीच सोडून दिल्याने ती रस्त्यावर उभा असणाऱ्या तिघांच्या अंगावरून गेली. या आयशर कंटेनरखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू ओढवला  आहे.

मिळालेल्या माहिती नुसार तिघेही रोजंदारी करणारे कामगार असल्याचे समजत आहे. शिवाय तोच कंटेनर काही कारना देखील जाऊन धडकल्याने त्यातीलही तीन ते चार जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. रस्त्यावर अशा प्रकारच्या होणार्या अपघातांमुळे असंबंधित लोकांची जीवितहानी होते. चालकाने अशाप्रक्रारे निरपधार लोकांचे जीवन संपवून पळून जाणे कितपत योग्य आहे! असा सवाल जनसामान्यांना पडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular