३ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खोपी – शिरगाव येथील रघुवीर घाट दिनांक २०/०७/२०२३ ते ३१/०७/२०२३ पुढील ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट हे पावसाळ्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. याठिकाणी पावसाळ्यात मुंबई, पुणे, खेड, सातारा परिसरातील लोक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.
रघुवीर घाट रस्ता व डोंगर भागालगत दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. सध्या हवामान खात्याने रत्नागिरी विभागात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे रघुवीर घाट व डोंगर भागालागत दरड कोसळून जीवित हानी होऊ नये यासाठी व मानवी जीवनास हानी पोहचू नये यासाठी सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून उपविभागीय अधिकारी सौ. राजश्री मोरे यांनी रघुवीर घाट पुढील ११ दिवसासाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.