25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeMaharashtraकोट्यवधींच्या खिशाला कात्री १ जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ

कोट्यवधींच्या खिशाला कात्री १ जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ

रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

देशभरातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेने दीर्घ कालावधीनंतर तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी हे निर्णय घेतले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकिटांच्या किमतीत अल्प प्रमाणात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने वाढणार आहे, तर एसी क्लासमध्ये २ पैसे प्रति किलोमीटर भाडे वाढणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासावर या भाडेवाढीचा परिणाम होणार आहे. जर एखादा प्रवांसी मुंबई ते दिल्ली (१४०० किमी) नॉन-एसी ट्रेनने प्रवास करत असेल तर त्याला १४ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

तर एसी क्लाससाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाने सेवा सुधारण्यासाठी हा बदल केला असल्याची माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे ५०० किमी पर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी ही भाडेवाढ लागू असणार नाही. नवीन भाडेवाढ ही ५०० किमी पेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना लागू असणार आहे. दुय्यम श्रेणीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटरसाठी अर्धा पैसा अतिरिक्त द्यावा लागणार आहे. व्दितीय श्रेणीच्या प्रवासी तिकीटात तसेच मुंबईतील उपनगरीय रेल्वे तिकीटात वाढ केली जाणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

आधारकार्ड अनिवार्य – रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार कार्ड ऑथेंटिकेशन गरजेचे असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने १० जून रोजी एका आदेशाद्वारे सर्व रेल्वे झोनना याबाबत माहिती दिली आहे. यामुळे आता दलाल किंवा अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे. इथून पुढे तत्काळ तिकिटे फक्त आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे बुक करता येणार आहे. तसेच १५ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आधारकार्डच्या ओटीपीची पडताळणी केली जाणार आहे. म्हणजेच तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे.

तत्काळ बुकिंगसाठी एजंटवर बंदी – तत्काळ तिकीट बुकिंग करताना आता अनधिकृत एजंट्स तत्काळ विंडो खुली झाल्यानंतर अर्धा तास तिकीट बुक करु शकणार नाहीत. सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकिटे सहज बुक करता यावीत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular