25.8 C
Ratnagiri
Sunday, September 15, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriइंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे वाहतूक दोन तास विस्कळीत

इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे वाहतूक दोन तास विस्कळीत

कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाली.

सोमवारी सकाळी कोकण रेल्वेची वाहतूक २ तास विस्कळीत झाली होती. कोकण रेल्वे मार्गाची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी ८.३० वा. सुमारास ही वाहतूक बंद पडली. यामुळे गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेसलाही फटका बसला. प्रवाशांची रखडपट्टी झाली. कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली या मार्गावर देखभालीसाठी फिरणारे सी, एमागांबर मशीन अचानक बंद पडल्यामुळे या भागातून याचदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली-एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या.

या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यामुळे विविध स्थानकांवर थांबून ठेवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजल्याने अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी २४ तास सतर्क असलेली कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाली. मार्गावर बंद पडलेले देखभाल इंजिन सकाळी १०:२४ वाजता बाजूला करण्यात आल्यावर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.

RELATED ARTICLES

Most Popular