22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraराज्यामध्ये पुन्हा पावसाचा "येलो अलर्ट"

राज्यामध्ये पुन्हा पावसाचा “येलो अलर्ट”

भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, नांदेड , लातूर आणि संपूर्ण विदर्भामध्ये “यलो अलर्ट” जाहीर केला आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले असून, पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, नांदेड , लातूर आणि संपूर्ण विदर्भामध्ये “यलो अलर्ट” जाहीर केला आहे.

विदर्भामध्ये काही वेळा दुष्काळ असतो, पावसाचे कुठेही नामोनिशाण नसते. तर यावेळी इतका पाऊस झाला आहे कि, डोळ्यासमोर सर्व तयार झालेली शेती वाहून गेली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, तिथे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाउस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परतीच्या पावसाला जशी विजेच्या कडकडाटाची सोबत असते तशीच स्थिती उद्भवणार असल्याने, शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे २-३ दिवस राज्यासाठी अतिशय काळजीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याकडूनही पुणे जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असून, उन्ह पडू लागल्याने एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. नाहीतर सततच्या पावसाच्या रिपरिप मुळे जनता हैराण झाली आहे. आगामी दोन दिवसांमध्ये घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने, पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य कोकण ,गोवा, महराष्ट्र , मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगावी.

RELATED ARTICLES

Most Popular