19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार - नाम. टोपे

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार – नाम. टोपे

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे पुढे म्हणाले कि,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी येण्याकरिता राज्य शासन जास्त भर देत आहे

रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ३१ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण कार्यक्रमावेळी आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

नाम. टोपे या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या मंत्रालयातून सहभागी झाले. यावेळी रत्नागिरी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव,  जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, खास. विनायक राऊत,  आम. भास्कर जाधव हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी राज्य शासनाने रत्नागिरी जिल्ह्यात मिशन कवच कुंडले अभियान राबविले असून, जास्त प्रमाणात लसीकरण करण्यासाठी रुग्णांची माहिती संकलित करुन ठेवावी, अशा सूचनाही श्री. टोपे यांनी दिल्या. रुग्णवाहिकांचे लोकार्पण कार्यक्रमास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा परिषदेच्या सीईओ  डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण आणि अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर  आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे पुढे म्हणाले कि,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी येण्याकरिता राज्य शासन जास्त भर देत आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ३१ रुग्णवाहिका देण्यात येत आहेत.

यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष सहकार्य होईल. रुग्णवाहिकांमुळे अर्भक-मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी होण्यात मदत होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णवाहिकांमुळे काही दुर्गम भागातील गर्भवतींची संस्थात्मकच प्रसूती होईल, याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना श्री. टोपे यांनी दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular