25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraनिवडणूक पार्श्वभूमीवर, रामराजे नाईक निंबाळकर राज्य शासनाकडे पर्यावरणपूरक शिफारस

निवडणूक पार्श्वभूमीवर, रामराजे नाईक निंबाळकर राज्य शासनाकडे पर्यावरणपूरक शिफारस

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेली हि शिफारस नक्कीच कौतुकास्पद आहे.

विधानभवनामध्ये वातावरणातील बदल व ग्लोबल वॉर्मिंग या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एक पर्यावरणपूरक अशा प्रकारची एक शिफारस करण्यात आलेली आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणूकांमध्ये उभे राहायचे असेल, तर तुमच्या मतदारसंघात तुम्हाला किमान १० झाडांची लागवड करणे गरजेचे आहे, अन्यथा त्याशिवाय तुम्हाला निवडणुकीसाठी अर्जच भरता येणार नाही. आणि विशेष म्हणजे याबाबतची पर्यावरण पूरक शिफारश खुद्द विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीच राज्य सरकारला केली आहे.

यावेळी ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भीय अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर काही शिफारशी देखील राज्य शासनाला करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहनांच्या इंधनाच्या धुरामुळे वायू प्रदूषण आणि आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण निर्माण होत असल्याने, इथून पुढे अधिक करून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात यावे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी वाहनतळ तसेच सोसायटीच्या पार्कींग स्थळी अग्रक्रमाने वाहने उभे करण्यास प्राधान्य देण्यात यावे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात यावे, तसेच इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग पोलची निर्मिती करण्यात यावी.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेली हि शिफारस नक्कीच कौतुकास्पद आहे. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आम. रोहित पवार, आम. संजय जगताप, आम. विनायक मेटे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular