26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeEntertainmentरणवीर-दीपिका ११९ कोटींच्या घरात होणार शिफ्ट

रणवीर-दीपिका ११९ कोटींच्या घरात होणार शिफ्ट

लग्नानंतर तो दीपिकासोबत तिच्या घरात राहत होता पण आता दोघेही एकत्र खरेदी केलेल्या घरात शिफ्ट होतील

बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी नुकतेच त्यांचे पहिले घर एकत्र खरेदी केले. दोघेही त्यांच्या नवीन घरात प्रवेश करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आता नुकतेच रणवीरने एका मुलाखतीत सांगितले आहे की, लग्नानंतर तो दीपिकासोबत तिच्या घरात राहत होता पण आता दोघेही एकत्र खरेदी केलेल्या घरात शिफ्ट होतील. रणवीरने म्हटले आहे की दीपिका घरगुती स्वभावाची आहे आणि नवीन घर खूप प्रेमाने सजवत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणवीर आणि दीपिकाच्या या नवीन घराची किंमत सुमारे ११९ कोटी आहे.

त्याच्या नवीन घराबद्दल आणि दीपिका पदुकोणबद्दल मीडियाशी बोलताना रणवीर म्हणाला – ‘दीपिका आणि मी नुकतेच आमचे पहिले घर एकत्र खरेदी केले आहे, लग्नानंतर मी तिच्या घरी राहायला आलो आणि जवळपास ४ वर्षांपासून तिथे राहतो. पण आता आम्ही आमचे घर विकत घेतले आहे.

आम्ही दोघंही आपापल्या कामात खूप व्यग्र असल्यामुळे आणि आम्हाला एकत्र राहायला जास्त वेळ मिळत नसल्यामुळे आम्ही घेतलेलं नवीन घर शहराबाहेर तसंच शांत आणि निर्जन ठिकाणी आहे. आम्हा दोघांसाठी दर्जेदार वेळ घालवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.

रणवीर पुढे म्हणाला- ‘दीपिकाने हे नवीन घर खूप प्रेमाने सजवले आहे. लहान मुलगी जसं बाहुलीचं घर सजवते, तसंच दीपिकाही तिच्या आवडीनुसार नवीन घर सजवण्यात व्यस्त आहे. ती स्वभावाने खूप घरगुती आहे, तिला गृहिणी व्हायला आवडते. त्यामुळे मला माझ्या नवीन घरात माझ्या प्रिय पत्नीसोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे.

दीपिका आणि रणवीरने नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले. २०१२ मध्ये ‘गोलियों की रासलीला रामलीला’ या चित्रपटानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. रामलीला व्यतिरिक्त दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि ८३ सारख्या इतर चित्रपटात एकत्र काम केले आहे. रिअल लाईफ व्यतिरिक्त दोघांची रील लाईफ जोडी देखील खूप आवडली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular