26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरंगांच्या कुंचल्यातून, निर्जीव दगडात प्राण ओतणारी उदयोन्मुख कलाकार

रंगांच्या कुंचल्यातून, निर्जीव दगडात प्राण ओतणारी उदयोन्मुख कलाकार

त्यांनी स्टोन पेंटिंग करताना काढलेला गणपतीपुळ्याचा गणेश आणि मांजराची काही चित्रं रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.

रत्नागिरीतील युवा कलाकार श्वेता केळकर या युवा चित्रकार म्हणून पुढे येत आहेत. त्यांची आणखी एक काहीशी वेगळी आवड म्हणजे स्टोन पेंटिंग. वेगवेगळ्या आकारातील दगड जमवून त्यांवर चित्रे रेखाटण्याचा त्यांचा छंद आहे. निर्जीव दगडात रंग भरणाऱ्या कलाकार, अशी त्यांची ख्याती आहे.

शाळेत असताना चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या तेवढ्याच. त्यानंतर त्यांनी कोणतेही रितसर शिक्षण घेतलं नाही; पण कला मात्र जोपासत राहिल्या. आधी जलरंगात सुरवात करून मग पोस्टर कलर, अक्रालिक रंग आणि तैलरंगात काम सुरू केलं. निसर्ग चितारायला त्यांना खूप आवडतं. तशीच आणखी एक आवड म्हणजे समुद्र चितारण्याची. असंख्य निसर्गचित्रे त्यांनी आजपर्यंत रेखाटली आहेत. गणपतीपुळे येथील गणेशमंदिर, आंबाघाटातील वळणे ही चित्रे विशेष आकर्षक ठरली आहेत. या सगळ्या आवडीचे चित्रकार आणि तिच्या शाळेतील शिक्षक रवींद्र मुळे सरांचं विशेष मार्गदर्शन मिळत असल्याचं त्यांनी सांगितले.

त्यानंतर श्वेता या व्यवसायाने स्थापत्य विद्याचे शिक्षण घेत पदवीधर झाल्या. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील विद्यालयातून पदवी घेऊन त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. असं असलं तरी त्यांची मूळ आवड चित्रकलेची आहे. निर्जीव दगडात रंग भरण्याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘कोणत्याही दगडावर चित्र रंगवता येत नाही. नदीत किंवा समुद्रात राहून एक बाजू गुळगुळीत झालेला दगड घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे चित्राशी सुसंगत, असा त्याचा आकारही असावा लागतो.

दगड हे कागद किंवा कॅन्व्हासच्या तुलनेत बरेच लहान असल्यामुळे त्यावर चित्र रंगवताना खूप जागरूक राहावं लागतं, त्याचबरोबर चित्र तयार झाल्यावर त्याला वॉर्निश लावल्यास ते चित्र धूळ व पाण्यापासून सुरक्षित राहात.’ त्यांनी स्टोन पेंटिंग करताना काढलेला गणपतीपुळ्याचा गणेश आणि मांजराची काही चित्रं रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular