23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील ३०% लसीकरण पूर्ण

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील ३०% लसीकरण पूर्ण

शासनाने १५ ते १८ वर्षांखालील बाधितांना लसीकरण सुरु केले असून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजारपैकी २० हजार ७६६ जणांना लस देण्यात आलेली आहे.

देशभरात वाढत असलेला ओमिक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोना लसीकरणावर जास्त भर दिला आहे. शासनाने १५ ते १८ वर्षांखालील बाधितांना लसीकरण सुरु केले असून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजारपैकी २० हजार ७६६ जणांना लस देण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण तीस टक्के जणांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संक्रमित दिवसेंदिवस वाढत आहेत. १८ वर्षांखालील लसीकरण सर्वाधिक झाल्यामुळे कोरोना बाधितांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या कमी होत आहे. ऑक्सीजनवरील आणि अतिदक्षता विभागातील बाधितांची संख्या देखील मागील वर्षाच्या मानाने खूप कमी आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दोन मात्रा शंभर टक्के नागरिकांनी घेण्यावर भर देण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी ७ लाख २८ हजार ७१० जणांनी दोन मात्रा घेतल्या म्हणजे त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे.

केंद्र शासनाकडून ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षांखालील तरुणांसाठी कोव्हॅक्सीनचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आठवड्यातून दोन दिवस बुधवारी आणि शनिवारी या वयोगटातील लाभार्थींना लस दिली जात आहे. प्राथमिक केंद्रांबरोबच शाळा,  महाविद्यालयांमध्येही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ऑनलाईन नोंदणीचे आवाहन करण्यात आली होती. त्यानुसार यशस्वीपणे नियोजन केले जात आहे.

शनिवारी सात हजार विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे ७१ हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत २० हजार ७६६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. हा डोस घेणार्‍यांना ताप येत असला तरीही त्याचा प्रभाव जास्त काळ राहीलेला नाही. लस घेतल्यानंतर कोणताही गंभीर त्रास झाल्याच्या नोंदी आरोग्य विभागाकडे आलेल्या नाहीत. २००७ मध्ये जन्म झालेल्या लाभार्थी लसीकरणासाठी पात्र ठरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी हा वयोगट सुरक्षीत राहण्यासाठी, आरोग्य यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. आजपासून बुस्टर डोससाठी लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular