25.4 C
Ratnagiri
Monday, February 6, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriआर्ट सर्कलमार्फत थिबा राजवाडा येथे संगीत महोत्सवाची घोषणा

आर्ट सर्कलमार्फत थिबा राजवाडा येथे संगीत महोत्सवाची घोषणा

२१ व २२ जानेवारी २०२३ ला थिबा राजवाडा येथे हा महोत्सव रंगणार असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार कला पेश करणार आहेत.

मागील दोन वर्ष महाराष्ट्रातील अनेक पूर्वापार सुरु असलेले कार्यक्रम, महोत्सव कोरोनाच्या संकटामुळे होऊ शकले नाहीत. मात्र त्याही परिस्थितीत आर्ट सर्कल आयोजित थिबा राजवाडा परिसरात होणारा संगीत महोत्सव मात्र खंड न पडता अजूनपर्यंत सुरू राहिला आहे. रत्नागिरीत शास्त्रीय संगीत व वादनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आर्ट सर्कलने संगीत महोत्सवाची घोषणा केली. महोत्सवाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. २१ व २२ जानेवारी २०२३ ला थिबा राजवाडा येथे हा महोत्सव रंगणार असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार कला पेश करणार आहेत.

२१ जानेवारीला सायंकाळी ७ वा. गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या शास्त्रीय सादरीकरणाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. त्यांना प्रणव गुरव तबलासाथ तर अथर्व कुलकर्णी संवादिनी साथ करतील. विदुषी पद्मा तळवलकर यांच्याकडून एक तपाहून अधिक काळ शिक्षण घेत यशस्वी यांची उज्ज्वल वाटचाल सुरू आहे. या महोत्सवामध्ये मुख्यत: गायिका यशस्वी सरपोतदार, तबलावादक विजय घाटे यांचा तालचक्र, ताकाहिरो अराई यांचे संतूर वादन, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर, मेहताब अली नियाझी यांचे संतूरवादन, व्यंकटेश कुमार यांचे गायन अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

तबलावादक विजय घाटे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेला तालचक्र हा ताल, लय, स्वर, पदन्यास यांच्या अनोख्या संगमाचा कार्यक्रम रंगणार आहे. तालाच्या विविध विभ्रमांची माहिती करून देणारा हा एक अभिनव कार्यक्रम आहे. यात विजय घाटे यांचे तबलावादन, ताकाहिरो अराई यांचे संतूर वादन, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर यांचे कथ्थक नृत्य अशी सर्व समावेशक मेजवानी तालचक्रच्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहे. याला संवादिनीसाथ अभिषेक सिनकर करणार आहेत. सांगतेच्या दिवशी २२ जानेवारीला भेंडी बाजार घराण्याचे वादक मेहताब अली नियाझी यांच्या सतार वादनाने सुरवात होईल. त्यांना तबलासाथ स्वप्निल भिसे करतील. अशा प्रकारे महोत्सवाची तयारी संपूर्ण जोशाने सुरु करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular